मुंबई/प्रतिनिधी :दि. २९: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी भागाचे सरचिटणीस श्री धनराज राठोड यांची आगामी कर्नाटक सार्वत्रिक विधानसभा निवडणुक प्रचारासाठी नेमणूक करण्यात आली आहे. ओबीसी विभागाचे अध्यक्ष श्री भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच त्यांचे नियुक्तीपत्र पक्षाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना पाठवले आहे. श्री धनराज राठोड हे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव असून तेथील बंजारा समाजामध्ये दांडगा प्रभुत्व आहे. मागील २२ वर्षांपासून ते काँग्रेस पक्षाचे काम पाहत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या भारत जोडो यात्रा मध्ये महाराष्ट्रात ओबीसी समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामध्ये त्यांनी कॅम्प इन्चार्ज म्हणून चोख जबाबदारी बजावली होती. त्यांचा कर्नाटकातील बंजारा मतदारांवर प्रभाव पडू शकतो.
त्यांना विशेषतः गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोली चित्तूर आणि गुलबर्गा ग्रामीण या मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा अनुभवाचा कर्नाटक सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नक्कीच फायदा होईल व त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे सरचिटणीस श्री धनराज राठोड यांची कर्नाटक निवडणुक प्रचारासाठी निवड
86 Views