KINWATTODAYSNEWS

माहूर तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी आमदार प्रदिप नाईकांनी केली शेतीची पाहणी

माहूर/प्रतिनिधी: काल दिनांक 27 फेब्रुवारी रोजी माहूर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली या गारपटीत शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी माहूर तालुक्यातील काही गावांना भेट देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली.
●मदनापूर ता.माहूर येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे

●मदनापूर ता.माहूर येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे गावातील घराचेंही अतोनात नुकसान झाले त्यांची पाहानी करताना गावकऱ्यां सोबत

●हरडफ येथे अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतात लावलेले भाजीपाला यात भेंडी,टमाटा, चवळी, इत्यादी भाजीपाल्यांचे अतोनात नुकसान झाले त्याची पाहणी करताना मा.आ.प्रदिप नाईक साहेब

●वाई परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले त्याची पाहणी करताना मा. आ. प्रदीप नाईक साहेब

141 Views
बातमी शेअर करा