किनवट/प्रतिनिधी:
किनवट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे आर्थिक स्वार्थासाठी ग्रामसेवकाच्या बदल्या करतात तसेच एकेका ग्राम सेवकाकडे अंदाजे दोन ते तीन ग्रामपंचायतीचा कारभार सोपविला जातो. अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे 23 जून 2021 रोजी निवेदनाद्वारे शिवसेना ता.उपप्रमुख अतुल दर्शनवाड यांनी केली आहे.
किनवट तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत हे गोकुंदा आहे या ठिकाणी कार्य करत असलेल्या ग्रामसेवकांनी शेत सर्वे नंबर 132 नियमबाह्य ले आउट मंजुरीसाठी (प्लेटिंग करिता) मंजुरी न दिल्यामुळे त्यांना त्या ठिकाणच्या कामावरून काढून टाकण्यात आले आहे व आपल्या मर्जीतील ग्रामसेवक श्री रावळे यांच्याशी आर्थिक देवाणघेवाण करून त्यांना त्या ठिकाणी नेमणूक देण्यात आली आहे. असा आरोप निवेदनात करण्यात आलेला आहे. तसेच पंचायत समिती किनवट येथे एक वर्षापासून 30 ग्रामसेवकाकडे कोणत्याही ग्रामपंचायत कारभार सोपविण्यात आलेला नाही. सदरील ग्रामसेवक कोणतेही काम न करता पगार उचलत आहेत असा आरोप करून किनवटचे गटविकास अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा अशी मागणी अतुल दर्शनवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.
किनवट पंचायत समितीत आर्थिक स्वार्थासाठी ग्रामसेवकाच्या बदल्या?;मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार.
184 Views