किनवट/प्रतिनिधी: मथुरानगर ते दत्तनगर रोड (VR गार्डन)येथील सिमेंट रोड अनेक ठिकाणी लहान मोठा करण्यात आला आहे. तसेच रस्त्याच्या शेवटी कॉर्नरला अगदी छोटा रस्ता बनवीण्यात आला असल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच मथुरा नगर नालीवर सिमेंट काँक्रीट न टाकल्याने येथे खड्डा झाला आहे. नवीन झालेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर टाकलेल्या काळ्या मातीमुळे अवकाळी पावसामुळे चिखल झाला आहे. या रस्त्यावरून दुचाकी धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
दोन मोटरसायकलस्वार घसरून पडल्यामुळे थोडीफार दुखापत झाली. परंतु मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिका प्रशासनाने सदरील गुत्तेदारांना त्वरित आदेशित करून सदरील सिमेंट काँक्रेट वर टाकलेली काली माती बाजूला करण्याच्या सूचना कराव्यात व ताबडतोब काळी माती हटविण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मथुरानगरच्या नवीन सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरील काळीमाती त्वरित काढा.
129 Views