किनवट ता.प्रतिनिधी: किनवट येथे आज रमजान ईद, महात्मा बसवेश्वर जयंती व भगवान परशुराम जयंती कार्यक्रम ठिकठिकाणी संपन्न झाले.
गोकुंदा येथील ईदगाह मैदानात ईदच निमित्त नमाज अदा करण्यात आली. याप्रसंगी मुस्लिम समाज बहुसंख्येने उपस्थित होता.तसेच इतर सर्व धर्मीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना आलिंगन देऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
तर जगतजोती महात्मा बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब पा. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शिंदे सर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून किनवटचे आमदार भीमराव केराम माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानिवार, के.मुर्ती, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नारायणराव सिडाम, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजप तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे ,माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमानवार,माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार, माजी नगरसेवक बालाजी धोत्रे, पत्रकार आनंद भालेराव,विजय जोशी,.
याप्रसंगी माजी प्राचार्य शिंदे सर व आमदार भीमराव केराम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमदार केराम यांनी पुढील वर्षीच्या जयंती पर्यंत महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्यात येईल असे समाजास आश्वासित केले. याप्रसंगी सतीश बिराजदार, पत्रकार सूर्यवंशीमहेश बिराजदार,शिवा क्यातमवार, लक्ष्मीपती दोनपेलीवार पत्रकार सूर्यवंशी,राघू मामा, सतीश बिराजदार, संजय बिराजदार, चंद्रकांत भंडारे, अनिल भंडारे, प्रल्हाद भंडारे, विश्वनाथ भंडारे, राजेंद्र वड्डे, चंद्रशेखर व्यवहारे, अरुण भंडारे, विजय महाजन, योगेश बिराजदार, मारोती गाढवे, किशन राकोंडे, राजाराम राईकवाडे, संतोष ठोंबरे, बबन राकोंडे, संजय भालके, नागनाथ भंडारे आदि समाजबांधव उपस्थित होते.
माजी आमदार प्रदीप नाईक यांनीही ईदगाह मैदान गोकुंदा, महात्मा बसवेश्वर जयंती व अनेक मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन ईद निमित्त व बसवेश्वर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या
तसेच पत्रकार विजय जोशी यांच्या निवासस्थानी भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, पत्रकार आनंद भालेराव भाजप तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमानवार उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष नसीर तगाले यांच्या घरी शीरखुर्मा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संपादक आनंद भालेराव,पत्रकार राजेश पाटील,रमेश परचाके, सय्यद नदीम, एडवोकेट विकास सूर्यवंशी, मारोती देवकते, गंगाधर कदम, शेख अतिफ,आशीष शेळके,चंद्रकांत कागणे,आदी उपस्थित होते.