KINWATTODAYSNEWS

मौजे चिखली बु.येथील कायदा व सुव्यवस्था कायम अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने इतर गावातील नागरिकांच्या हस्तक्षेपावर प्रतिबंध घालण्यात यावा-गावकरी

किनवट ता.प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील मौजे चिखली बुद्रुक येथे कायदा व सुव्यवस्था कायम अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने इतर गावातील नागरिकांच्या हस्तक्षेपावर प्रतिबंध घालण्यात यावे अशी मागणी चिखली बुद्रुक येथील गावकऱ्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक किनवट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

किनवट तालुक्यातील मौजे चिखली बुद्रुक येथे दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी शुल्क कारणावरून दोन गटात वादावादी झाली व वादावादीचे रूपांतर हाणामारी झाली. या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. सध्यास्थितीत मौजे चिखली बुद्रुक येथे चोख पोलीस बंदोबस्त असून गावात शांतता आहे.
गावात शांतता असताना इतर गावातील काही राजकीय क्षेत्रातील विघ्नसंतोषी लोक गावात येऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असून इतर लोकांच्या हस्तक्षेपामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मौजे चिखली बुद्रुक, बुधवार पेठ व मालकवाडी या तिन्ही गावातील सर्व नागरिक कुण्या गोविंदाने राहतात हिंदू मुस्लिम समुदायातील सर्व नागरिकांच्या सण उत्सवात सहभागी होतात त्यामुळे येथील कोणत्याही प्रकारचा धार्मिक वाद अथवा जातीतील निर्माण होत नाही. परंतु दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी दोन गटात झालेल्या शिल्लक भांड्याला इतर गावातील काही लोक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करून गावात तणाव वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.
चिखली बुद्रुक, बुधवार पेठ, मलकवाडी या तिन्ही गावातील नागरिकांचा धार्मिक व सामाजिक सलोखा लक्षात घेता या प्रकरणात इतर गावातील राजकीय क्षेत्रातील नागरिकांचा हस्तक्षेप रोखण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करून शांतता अबावधीत ठेवावी अशी विनंती तिन्ही गावच्या वतीने करण्यात आली आहे .
या निवेदनावर हुसेन देवराव तुमराम, संतोष माधवराव अडकिने, वसंतराव कुडमते सरपंच ग्रामपंचायत बुधवार पेठ, गोविंदराव धुर्वे सरपंच ग्रामपंचायत मालकवाडी, शेख मुखराम शेख उस्मान उपसरपंच चिखली बुद्रुक, सटवाजी गणपती गोपने, भीमराव पाटील सामाजिक कार्यकर्ता, प्रकाश माने, रवी तुकाराम माजी सरपंच चिखली बुद्रुक, जाबेर शेख, हाशम पाशा, शेख सहाब अलाउद्दीन शेख मेहबूब, बालराज पोचया कोलपेल्लीवार व अन्य गावकरी मंडळी उपस्थित होते.

201 Views
बातमी शेअर करा