किनवट/ प्रतिनिधी : 10एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनाच्या अनुषंगाने किनवट पोलीस स्टेशन येथे किनवट पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीचे सदस्यांची बैठक संपन्न झाली.
बैठकीला आजूबाजूच्या खेड्यातील जयंती मंडळाचे पदाधिकारी, तसेच किनवट शहरातील मंडळाचे पदाधिकारी , प्रतिष्ठित नागरिक व शांतता समितीचे सदस्य, पत्रकार बांधव असे उपस्थित होते.
मिरवणुकीच्या व जयंती कार्यक्रमाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या. शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी असे आवाहन सर्व जयंती उत्सव मंडळांना करण्यात आले.
249 Views