मोहपुर/प्रतिनिधी: आदिवासी क्षेत्र असलेल्या पानोळा बीटा मधील मोह फुले वेचण्यासाठी जंगलामध्ये गावातील लोक पहाटे जातात . व मोहफुलें वेचण्या साठी जंगलात आगी लावतात. त्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार व वन परिमंडळ अधिकारी यांच्या आदेशानुसार वनरक्षक कौशल्य परसराम भरकाडे सकाळीच जंगलामध्ये जाऊन जंगलामधील मोह फुलाचे झाडे ब्लोअर मशीन द्वारे गावकरी लोकांना मोह फुले वेचण्याकरिता झाडाखालील पालापाचोळा साफ करून देतात.
जंगलामध्ये अंदाजे अडीच ते तीन हजार मोह फुलाचे झाडे आहेत त्यामधील 575 मोह फुलाचे झाडे पाच वाजता सकाळी जाऊन झाडाखालील पालापाचोळा ब्लोअर मशीन द्वारे साफसफाई करून देण्यात आले. आणि त्या गावातील लोक मोह वेचण्या करिता सकाळी पाच वाजता जंगला मध्ये जातात आणि मोह फुले वेचण्याकरता पालापाचोळा जाळतात. त्यामुळे वनरक्षक भरकडे मॅडम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या आदेशाने जंग जंगलाला आग लागू नये म्हणून जंगलामधील मोह फुलाच्या झाडाखालील पालापाचोळा साफ करून दिला. त्यांनी लोकांना समजावून सांगितले की साफ केलेल्या झाडाखालीच मोह फुले वेचा जंगलाला आग लावू नका
वनरक्षक कौशल्य परसराम भरकाडे सकाळीच जंगलामधील मोह फुलाचे झाडाखालील पाचोळा ब्लोअर मशीन द्वारे साफ करून देतात
2,684 Views