किनवट / (ता.प्रतिनिधी)
कोरोना विषाणू या महामारीमध्ये मुंबई ते नागपूर एक्सप्रेस बंद करण्यात आली होती तेंव्हापासून आजपर्यंत ही रेल्वे सेवेसाठी किनवट तालुका पत्रकार परिषदेचे तालुका सचिव तथा काँग्रेस कमिटी किनवट अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिनांक 10 एप्रिल रोजी तालुका दंडाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलनास बसले असुन देशात आजच्या परिस्थितीमध्ये सर्वत्र सन, महोत्सव, निवडणुका, विविध कार्यक्रम आणि नवीन रेल्वे सेवा नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत परंतु नागपूर जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस बंद केलेली अद्यापही सुरू न केल्याने भोकर हिमायतनगर, सहस्त्रकुंड, बोधडी, किनवट, आदिलाबादच्या व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, कामगार वर्गाची मोठी अडचण निर्माण झाली असल्याने विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांनी तातडीने नंदिग्राम एक्सप्रेस नागपूर पर्यंत तर तपोवन आणि पनवेल या दोन गाड्या आदिलाबाद पर्यंत सोडण्याची मागणी आंदोलनातून व्यक्त केली आहे. याचा गांभीर्याने सकारात्मक विचार करून जनतेच्या हिताचा निर्णय तातडीने घ्यावा. अशी ही मागणी धरणे आंदोलन कर्ते तथा किनवट वासीयांकडून करण्यात आली आहे.
नंदिग्राम एक्सप्रेस नागपूर पर्यंत तर तपोवन आणि पनवेल आदीलाबाद पर्यंत सोडावी. एकदिवसीय धरणे आंदोलन
145 Views