किनवट शहर प्रतिनिधी(राज माहुरकर):–
किनवट तालुका हा अतिदुर्गम भाग असून आदिवासी बहुल भाग आहे अशा या तालुक्यामध्ये आदिवासी साठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय संविधानातील अनुसूची 5 व 6 अंतर्गत पेसा कायद्यानुसार 134 ग्रामपंचायती पैकी 92 ग्रामपंचायती पेसा मध्ये समाविष्ट असून पैकी गोकुंदा ग्रामपंचायत पेसा मध्ये समाविष्ट आहे सदर ग्रामपंचायतीस पेसा निधी, वित्त आयोगाचे निधी, ग्रामनिधी अशा अनेक प्रकारचा निधीतून गावाचा विकास करत असताना कामामध्ये सरपंच, ग्रामसेवक व उपसरपंच यांनी संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नांदेड ग्रामीण अनुसूचित जमाती जितेंद्र कुलसंगे यांनी दिनांक 30- 4 – 2019 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्याकडे सादर केले.
नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्त उत्पन्न देणारे किनवट तालुक्यातील पंचायत समिती पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायत कार्यरत आहे सदर ग्रामपंचायतीची स्वतंत्र स्थापना 1988 – 1989मध्ये झाली असून गोकुंदा ग्रामपंचायतीस 32 वर्षाचा कालावधी लोटला आहे या दरम्यान पंचवार्षिक निवडीनुसार सरपंच व ग्रामसेवक म्हणून बरेचसे कर्मचारी यांनी कर्तव्य बजावले असून प्रत्येकाने आपापल्या कालावधीमध्ये कोणता ना कोणता विकास केलेला आहे परंतु गावातील होत असलेली वस्ती वाढ लक्षात घेऊन काही सरपंच ग्रामसेवक यांनी नियोजन केलेले दिसून येत नाही यामुळे गावातील मूलभूत सुविधा असो की गावातील शेतामध्ये लेआऊट करून पाडलेले प्लॉट असो पाडलेल्या प्लॉट मध्ये एकाही प्लॉट मध्ये एखादी घटना घडल्यावर शासनाचे व अग्निषमक असे कोणतेच वाहन ये-जा करू शकत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे या बाबीकडे वरिष्ठा कडून नजर अंदाज केल्या जाते त्याचे जिवंत उदा म्हणजे सहाय्यक जिल्हाधिकारी, अधिकारी ग्रामपंचायत परिसरामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून अनेक वर्षापासून कार्यरत आहेत ग्रामपंचायत समोर शासकीय विश्रामगृह असल्याने जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी येथे वास्तव्यास दौऱ्यानिमित्त राहत असतात परंतु एकाही अधिकार्याने आजपर्यंत ग्रामपंचायतीस साधी भेट सुद्धा दिलेली नाही म्हणून या ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या नावावर फक्त कागदी घोडे आज पर्यंत चालविण्यात आले असल्याने करोडो रुपयाचा निधी खर्च होऊन ही विकास शून्यच कसा असा गंभीर प्रश्न निर्माण होत असून ग्रामपंचायतीच्या अनेक तक्रारी करूनही चौकशी होत नसल्याचे दिसत असल्याने भाजपाचे विद्यमान आमदार असून नांदेड ग्रामीण जि.उपाध्यक्ष अनु जमाती मोर्चाचे जितेंद्र कुलसंगे यांनी तक्रार दाखल केली असून तक्रारींमध्ये पेसा 14 वा वित्त आयोग covid-19 चा निधी अशा अनेक निधिकडे अर्जदाराने लक्ष आपल्या तक्रारीत वेधले आहे तसेच अर्जदाराने चौकशी होऊन दोषी विरुद्ध कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल असेही नमूद केले असून निवेदनावर गोविंद अंकु लवार जिल्हाध्यक्ष नांदेड डी.जी. भिसे सदस्य संतोष कनाके तालुकाध्यक्ष सदर निवेदनावर स्वाक्षऱ्या असून तक्रारीनुसार चौकशी होऊन गोकुंदा ग्राम वासियांना न्याय मिळेल काय याकडे ग्रामवासी यांचे लक्ष लागले आहे.