KINWATTODAYSNEWS

मुख्यबाजारपेठेतील संविधान स्तंभाचे सुशोभीकरण करा बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

किनवट प्रतिनिधी: शहरातील जुन्या नगरपरिषदेसमोरील मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी व प्रमुख मार्गावर असलेल्या संविधान स्तंभाची अवस्था बिकट बनली असून जागोजागी तडे जाऊन स्तंभ मोडकळीस आला आहे
लोकशाहीचे प्रतीक म्हणून प्रेरणा देणाऱ्या या संविधान स्तंभाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय वाघमारे यांनी नगर परिषदेकडे लेखी निवेदणाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की किनवट शहरातील जुन्या नगर परिषदेसमोरील मुख्य बाजार पेठेच्या ठिकाणी प्रेरणादायी संविधान स्तंभ अस्तित्वात आहे. भारत सरकारच्या वतीने सन 1972-73 साली स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त या स्तंभाची उभारणी करण्यात आली. स्तंभावर संविधानाची उद्देशीका लिखित करण्यात आली. आजमितीस या संविधान स्तंभाला 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु नगर पालिकेच्या दुर्लक्षमुळे या स्तंभाची अवस्था बिकट बनली आहे.ऊन, वारा, पावसामुळे स्तंभाला जागोजागी भेगा पडून सिमेंटचे आवरण गळून पडत आहे. मागील अनेक वर्ष तर हा स्तंभ अतिक्रमाणाच्या विळख्यात अडकला होता परंतु संविधानप्रेमी नागरिकांनी या संदर्भात आवाज उठविल्यामुळे स्तंभाजवळील अतिक्रमण काढण्यात आले.संविधान स्तंभाची जीर्ण अवस्था लक्षात घेता नगरपरिषदेने या संविधान स्तंभाचे तात्काळ सुशोभीकरण करून स्तंभाच्या चारही बाजूला संरक्षित भिंती उभ्या कराव्यात अशी मागणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्या वतीने करण्यात आली असून संविधान स्तंभाच्या सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष विजय वाघमारे यांनी निवेदनातुन दिला आहे.

194 Views
बातमी शेअर करा