KINWATTODAYSNEWS

मध्यप्रदेश राज्यातुन पिस्टल आणुन नांदेडमध्ये विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्या गुन्हेगारांना अटक.. वजीराबाद गुन्हे शोधची उत्कृष्ट कामगिरी

*चार गावठी पिस्टल, 30 जिवंत काडतुस, 01 मॅग्झीन, सह 1,13,100/- रुपयाचा ऐवज जप्त*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.03.पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीमध्ये घडलेल्या गोळीबार घटनेच्याअनुषंगाने मा.श्री.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड,मा.श्री.अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक,नांदेड, मा.श्री.चंद्रसेन देशमुख उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग,नांदेड शहर,मा.श्री. सिध्देश्वर भोरे,उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग इतवारा यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या सुचना दिल्या. त्याच अनुषंगाने दिनांक 06.04.2023 रोजी अचानक ऑल आऊट ऑपरेशन राबवून अभिलेखावरील शस्त्र बाळगणाऱ्या अनेक गुन्हेगारांना चेक करुन त्यांच्या हालचालीची व नांदेड शहरात शस्त्र आणुन विक्री करणाऱ्या बायतची माहीती घेण्याचा प्रयत्न केला.
दिनांक 07.04.2023 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,एक इसम हिंगोली गेट उड्डानपुलाचे खालील फुलमार्केट परीसरामध्ये गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी आलेला असुन सध्या त्याचे कमरेला एक पिस्टल असल्याची माहीती मिळाली.
सदर माहीतीच्या अनुषंगाने मा. श्री.चंद्रसेन देशमुख,उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड,श्री.जगदीश भंडरवार, lपोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी शिवराज जमदडे,पोहेकॉ / दत्तराम जाधव, पोना/ शरदचंद्र चावरे, पोना/ मनोज परदेशी, पोना/ विजयकुमार नंदे, पोकॉ/ शेख ईम्रान शेख एजाज, पोकों बालाजी कदम,पोकों/ रमेश सुर्यवंशी,पोकॉ/ व्यंकट गंगुलवार, पोकॉ/ भाऊसाहेब राठोड, पोकों/ अरुण साखरे सदर ईसनाचा शोध घेणेकामी रवाना झाले. सदर ठीकाणी एक ईसम लोकांच्या गर्दीमध्ये संशयास्पद हालचाली करीत असतांना दिसुन आल्याने त्यास पकडुन त्यांचे नांदगांव विचारणा करता त्यांनी आपले नांव भोलासिंघ उर्फ हरजितसिंघ उर्फ पोलो पिता चरणसिंघ बावरी, राहणार एनडी 41 सिडको नांदेड असे सांगितले.पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी पिस्टल व सात जिवंत काडतुस व गुन्हयात वापरलेली मोटरसायकल मिळुन आली. सदर प्रकरणी पोना/ विजयकुमार नंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पो.स्टे वजीराबाद गु.र.न. 101/2023 कलम 3/25 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासात तपासीक अंमलदार शिवराज जमदडे यांनी आरोपीस अधिक विश्वासात घेउन विचारणा केली असता सदर आरोपीने ईतर तीन गावठी पिस्टल व काडतुस नांदेड शहरात विक्री केल्याची माहीती दिल्यावरुन आरोपी रोशन सुरेश हाळदे,राहणार गोविंदनगर नांदेड यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचेकडुन एक गावठी रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले. तसेच महमद तौफीक शेख सनदलजी रा.गल्ली नंबर 24 लक्ष्मीनगर,जुल्लेखा मस्जीदजवळ नांदेड यांचेकडुन दोन गावठी पिस्टल मॅग्झीनसह, 23 जिवंत काडतुस एक रिकामी मॅग्झीन जप्त करण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचे तपासात गावठी पिस्टल मध्यप्रदेश राज्यातून आणुन विक्री होत असल्याचे उघड झाल्याने त्यामध्ये कलम 7/25 भारतीय शस्त्र अधिनियम हे कलम वाढ करण्यात आले आहे.

मध्यप्रदेश राज्यातुन गावठी पिस्टल आणुन विक्री करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक करुन त्याचेकडुन चार गावठी पिस्टल, 30 जिवंत काडतुस, 01 मॅग्झीन, व गुन्हयात वापरलेली मोटरसायकल सह 1,13,100/- रुपयाचा ऐवज जप्त केल्यामुळे वरीष्ठांनी गुन्हे शोध पथक वजीराबाद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

208 Views
बातमी शेअर करा