KINWATTODAYSNEWS

शासकीय धान्य गोदाम धर्माबाद येथून रास्त भाव दुकानदारास ‘आनंदाचा शिधा ‘वाटपास प्रारंभ.

*१७ हजार शिधापत्रिका धारकांना मिळणार “आनंदाचा शिधा”

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.8.महाराष्ट्र शासनाने गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देऊन सामान्य लोकांचे तोंड गोड करण्याचा निर्णय घेतला होता.

ह्या शिधा वाटपाच्या माल शुक्रवारी (ता.७)धर्माबाद तहसील पुरवठा विभागात पोहचला असून या ‘आनंदाच्या शिद्याचे’ तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते पूजन करून शिधा ग्रामीण भागात वितरणासाठी रवाना करण्यात आला.त्यावेळी नायब तहसीलदार राठोड सर,गोदाम पालं अशोक भालेरावं,व पत्रकार बंधू उपस्थित होते.सामान्य व गोरगरीब जनतेचे सण–उत्सव गोड व्हावे यासाठी शासनाने शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत १ किलो रवा,१ किलो चणाडाळ,१ किलो साखर आणि १ लिटर तेल देण्याचा निर्णय घेतला.महागाईच्या काळात जगणं मुश्किल होत असताना या आनंदाच्या शिद्यामुळे लोकांना तेवढाच दिलासा मिळत आहे.
धर्माबाद तालुक्यात एकूण १७ हजार ४४४ शिधापत्रिकाधारक आहेत.

या पैकी २४५५ अंत्योदय कार्डधारक,१०८१८प्राधान्य योजना,तर ४१७१ केशरी रेशनकार्डधारक आहेत.या सर्वाना ई-पॉस’द्वारे शिधा वितरित केला जाणार आहे. ‘ई-पॉस’ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.ह्या शिधा वाटपसाठी गुडी पाडवा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दरम्यानचा कालावधी शासनाने निर्धारित केला होता.

पाडव्याला हा शिधा काही तांत्रिक कारणामुळे पोहचू शकला नसला तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंद शिधा लोकांना मिळणार असल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

धर्माबाद तालुक्यातील सर्व पात्र शिधापत्रिका धारकांना काटेकोर नियोजन करून वेळेत ‘आनंदाचा शिधा’ वितरित करू असा विश्वास नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी पंडित राठोड यांनी व्यक्त केला.यावेळेस साईनाथ चांद्रया गोरजे,भुकोळ लक्ष्मण पाटील,धर्मान्ना तोंडाकूरवाड,माधव अवधूते, देवके,मंगरुळे पाटील,शिवशेटे शकर पाटील,गंगाधर अवधूते, मिटूवाघमारे, राहुल वाघमारे,धनकवाड शकर,शकर पाटील रापुरे,शिवाजी पाटील कदम,सोनकाबळे सिद्धर्थ,अमर चंदावार, हमाल मध्ये गंगाधर, अवधूते, इरकांत वाघमारे,सुनीत वाघमारे,व आदि उपस्थित होते.

धर्माबाद तालुक्यासाठी आनंदाच्या शिधा किटमधील साखर,चनाडाळ, रवा व तेल सर्व वस्तू प्राप्त झाल्या लवकरात लवकर सर्वच गावात वितरणास सुरवात करत आहे .

धर्माबाद तहसीलदार दत्तात्रय शिंदे

आनंदाच्या शिद्याचे सर्व वस्तूचा माल गोदामात आला असून तो लवकरात -लवकर लोकांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करु.

अशोक भालेराव
गोदामपाल

131 Views
बातमी शेअर करा