KINWATTODAYSNEWS

गोकुंदा येथील स्मशानभूमी जमिनीवरील बेकायदेशीर कब्जा हटवा अन्यथा आंदोलन- वंचित बहुजन आघाडी

किनवट ता.प्रतिनिधी: गोकुंदा ग्रामपंचायत च्या हद्दीतील शेत गट क्रमांक 116 मधील 5 गुंठे जमीन ही स्मशानभूमीसाठी आरक्षित असतानाही काही भूखंड माफीयांनी ग्रामपंचायतला हाताशी धरून आरक्षित जागेवर ताबा करून करून बांधकाम केलेले आहे.या प्रकरणाचे वंचित बहुजन आघाडीने रीतसर नियोजन करून जागा खुली करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांची दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा वंचितचे राजेंद्र शेळके यांनी दिला आहे.
गोकुंदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शेत सर्वे क्रमांक 116 मधील 5 गुंठे क्षेत्र हे मागील सुमारे 70 वर्षापासून स्मशानभूमी म्हणून आरक्षित आहे. परंतु 2018 सालापासून गोकुंदा ग्रामपंचायत व भूखंड माफियांनी संगणमत करून मसनवटायची जागा बळकविण्याचा प्रयत्न चालविला आहे. गोकुंदा ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक आणि सदस्य यांनी आरक्षित जागेपैकी काही जागा बनावट कागदपत्राद्वारे विक्री करून त्या ठिकाणी इमारत बांधकाम परवानगी दिली आहे. काही भूखंड माफीयांनी रातोरात शेत गट क्रमांक 114 व 115 कवेलू कारखाना खरेदी केल्यानंतर मोजणी करताना या मोजणीत समशानभूमीची जागा गायब केली. व त्यानंतर दडपशाही करून दलित स्मशानभूमीवर अवैद्य कब्जा केला आहे. 5 गुंठे जागेपैकी काही जागेवर इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून या बांधकामाला ग्रामपंचायत ने परवानगी दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित केला आहे. गोकुंदा ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच पदाधिकारी ग्रामविकास अधिकारी व भूखंड माफिया यांनी संगणमत करून संघटित रित्या बनावट दस्त तयार करून मसनवटनाची आरक्षित 5 गुंठे जमीन बळकविल्याचा आरोप करत ही जागा हा अतिक्रमणमुक्त न झाल्यास लोकशाही मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी दिला आहे.

71 Views
बातमी शेअर करा