KINWATTODAYSNEWS

28 वन मजुरांचे वेतनासाठी किनवट वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर धरणे आंदोलन

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)
तालुक्यातील पाच परिमंडळातील 28 वन  मजुरांचे 1 एप्रिल 2020 व 22 डिसेंबर 2020 पासून काम केलेले वेतन मिळण्यासाठी दिनांक 22- 6- 2021 पासून वनपरिक्षेत्र अधिकारी किनवट यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस चालू आहे.

किनवट वनपरिक्षेत्र अंतर्गत पाच परिमंडळ कार्यरत असून परिमंडळातील कामे वन मजुरांमार्फत जसे वन अगस्त वृक्षाचे संरक्षण, रोप लागवड, वनातील अशी अनेक कामे करून घेतल्या जातात तसेच कोरोना काळातही वन मजुरांनी उत्तम सेवा बजावली आहे परंतु सर्व वनमजूर वीस वर्षापासून कार्यरत असून वनसंवर्धनातील कामे करण्यासाठी वनमजुर असणे आवश्यक असल्याचा अहवाल वरिष्ठाकडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेला आहे वरिष्ठांकडून आदेश व रक्कम प्राप्त झाल्याशिवाय तुमचे वेतन अदा करता येणार नाही असे कार्यालयाकडून मजुरांना सांगितल्याचे निवेदनात नमूद असून निवेदनावर “भोजू रामा जाधव” व इतर वन मजुरांच्या स्वाक्षर्‍या आहेत..

267 Views
बातमी शेअर करा